Chandrapur : जिल्ह्यातील गोंडपिपरी,येथून बल्लारपूरकडे जाणाऱ्या ट्रकला पिकअपने समोरासमोर धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,यामध्ये पिकअपमधील संदीप कुळमेथे,रमेश वाढाई यांचा मृत्यू झाला तर रमेश मडावी,हा गंभीर जखमी झाला आहे.सदर घटना 13 जून रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान घडली.हे तिघेही पिकअप क्रंमांक MH/34/BG/8899,ने किराणा माल घेऊन गोंडपिपरीकडे निघाले.त्यावेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक MH/40/DF/1437,सोबत गणपूर जवळ भीषण अपघात घडला.घटनेची माहिती मिळताच कोठारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.पुढील तपास पोलीस करत आहेत.
#Accident News...
#Pickup Truck Accident near Kanpur...
@@@@@@@@@@@@@@@@@@