Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक पेट्रोंलिंगवर असताना गोपनीय माहिती मिळाली की,एका इसमाने विना कागदपत्रांची बाईक विक्रीसाठी स्थानिक तूकूम परिसरातील एसटी वर्कशॉपच्या जवळ आणली आहे.या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून बाईकसह आरोपीला ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली असता गडचिरोली येथील एका महिलेची सुद्धा चैन हिसकावल्याचे त्याने कबूल केले.जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग टाक(45)वर्षे रा.समतानगर,नेरी चौक,उर्जानगर चंद्रपूर, असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने काळ्या-पांढऱ्या रंगाची स्पलेंडर प्रो क्रं.MH/34/ AX/3848,बाईक नायडू हॉस्पीटल,तुकुम चंद्रपूर,येथून चोरी केल्याचे कबुल केले.यावरून आरोपीला अटक करून दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनिल गौरकार,पोहवा. सुभाष गौहकार,नितीन साळवे,नितीन कुरेकार,सतीश अवधरे,दिपक डोगरे,गोपाल आतकुलवार,पोकां.किशोर वाकाटे,शशांक बदामवार,प्रसाद धुळगंडे यांनी केली आहे.
#Action by Local Crime Branch Chandrapur...
#Chandrapur District Crime News...
-----------)(----------