Farmer woman Death : हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकरी महिलेचा शेतात मृत्यू.|Marathi News...

News@Shocking...

Chandrapur District Farmer Woman Death : ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील एका शेतकरी महिलेचा शेतात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना 13 जून रोजी घडली.सुनिता धर्माजी आत्राम वयवर्ष 45,असे मृत महिलेचे नाव आहे.सुत्रांच्या माहितीनुसार, सदर महिला नेहमी प्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेली असता,शेतात काम करीत असताना अचानकपणे सकाळी 9 च्या दरम्यान तिचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

       सदर महिलेला 1 मुलगा व 2 मुली असून,एका मुलीचा विवाह झाल्याचे कळते.आता मात्र भाऊ व बहीण आईच्या प्रेमापासून पोरके झाले आहेत.काही वर्षांपूर्वी पती धर्माजी आत्राम यांचाही दीर्घ आजाराने निधन झाला होता.मुलगा हर्षद वयवर्ष 25 व मुलगी पायल वयवर्ष 22,यांच्यावर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे? वडिलानंतर आता आईच्या मृत्यूने कुटूंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.शोकाकूळ वातावरणात मालडोंगरी येथे मृतक महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

#Shocking incident...

#Farmer woman Death...                                                                          @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-