Misuse of social media : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील काही लोकांनी 6 जून शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास "itz_chandrapur" या Instagram ग्रुपवर "बल्लारशाह-कारवा रोडपर रात गोमाता के साथ दुष्कर्म का प्रयास" असा उल्लेख केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करून व्हॉयरल केला होता.बल्लारपूर येथील बजरंग दल आणि इतर संघटनांनी याविषयी आक्षेप घेवून पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.या तक्रारीवरून संबंधीतांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सर्वप्रथम समाज माध्यमांवर व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओला डिलीट करून घेण्यात आला.
दरम्यान गुन्ह्याच्या सखोल तपासाअंती दृष्कृत्य करणारा इसम नामे प्रल्हाद भाटु राठोड(65)वर्ष,दृष्कृत्याचा व्हिडीओ बनविणारा विजय मोहन पाल(22)वर्ष,तसेच 3 महिन्यानंतर सदर आक्षेपार्ह व्हिडीओ itz_chandrapur या Instagram चॅनलवर प्रसारीत करणारा शुभम सुधाकर खोब्रागडे(29)वर्ष व सदर व्हिडीओ समाज माध्यमावर वॉयरल करणारे हर्षद उर्फ गोलू रमेश घोटेकर(27)वर्ष, विजय मधुकर ढोक(26)वर्ष,पुरुषोत्तम ज्ञानबाजी सहारे (42)वर्ष,नरेश शिवा वर्मा(32)वर्ष सर्व रा.बल्लारपूर यांना गुन्ह्याच्या पुराव्याअंती अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव,यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्याम गव्हाने यांच्या नेतृत्वात सपोनि.मदन दिवटे,पोउपनि.प्रेमश सयाम,पोह.संतोष दंडेवार,पोअं.शरदचंद्र कारूष,वशिष्ट रंगारी,भास्कर चिंचवलकर,सचिन राठोड पो.स्टे.बल्लारपूर आणि सायबर पोलीस यांनी केली आहे.
"नागरिकांना आवाहन."
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,समाज माध्यमांवर पोस्ट टाकतांना सामाजिक बांधीलकी ठेवावी, कोणत्याही जाती/धर्माची भावना दुखावणारे पोस्ट टाकू नयेत.अशा प्रकारचे कोणतेही कृत्य किंवा पोस्ट आढळून आल्यास त्वरीत त्याची माहिती पोलीसांना देवून सहकार्य करावे,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहेत.
#Misuse of Social Media...
#Social Media...
#Instagram...