Crime : कोंबडा बाजार व जुगारावर पोलिसांची धाड|Marathi News...

News@कोंबडा बाजार...

               Chandrapur : जिल्ह्यातील चिमूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात येणाऱ्या स्मशानभूमी,मौजा चक ता.पोंभूर्णा येथील सार्वजनिक ठिकाणी कोंबडा बाजार व जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.या माहिती वरून पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळत असल्याचे दिसून आले.पोलिसांना पाहून 10 जुगारी त्यांची वाहने तसेच कोंबड्यांच्या झुंजीत वापरण्यात येणारी वस्तू सोडून पडून गेले.3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या अंगझडतीत रोख रक्कम मीळून आली.

                             "मिळून आलेला मुद्देमाल."

   9 दुचाकी,प्रत्येकी किंमत 50 हजार,असा एकूण 4 लाख 50 हजार.एक काळी-पिवळी टॅक्सी चारचाकी वाहन किंमत अंदाजे 2 लाख,50 हजार.अंगझतीत मिळालेले 2 हजार 400.जखमी कोंबडे 5,किंमत अंदाजे 1 हजार 300. लोखंडी धारधार कात्या 20, किंमत अंदाजे 1 हजार,असा एकूण 7 लाख,4 हजार 700 रूपांचा मुद्देमाल जप्त करून संजय रामदास सोनटक्के(45)रा.चकफुटाणा,प्रवीण चरणदास सोनटक्के(35)रा.देवळा खुर्द पोंभुर्णा,भीमा शंकर पेंदोर(34)रा.कवडजई ता.बल्लारपूर,या तिघांना अटक करून,यांच्यासह पडून गेलेले इतर 10 आरोपींवर पोलीस स्टेशन मूल येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव(अतिरिक्त कार्यभार उपविभाग मूल),सपोनि.सुबोध वंजारी(प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मुल)यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अमितकुमार आत्राम,पोहवा.जमीरखान पठाण,पोहवा.सुनिल कुळमेथे, पोअं.वेदनाथ करंबे,पोअं.गणेश मेश्राम,पोहवा भोजराज मुंडरे,पोहवा.प्रशांत गायकवाड,पोअं.नरेश कोडापे,पोअं. पंकज बागडे,चापोअं.शिवशंकर डुकरे,पो.स्टे.मूल यांनी केली आहे.

#Crime News...

#Chandrapur District Crime Riport...

                                  ----------)(----------

-:Advertisement:-