Chandrapur : मधुराम तुलसींग कोल्हा वयवर्ष 34 रा. कोडाखुरी ता.द्रककॉड जि.कांकेर छत्तीसगड हे,13 जुन रोजी रात्री 8 च्या दरम्यान सपना टॉकीजजवळ जलनगर वार्ड चंद्रपूर,येथे पाणी बॉटल घेण्यास गेले असता,एका अज्ञात व्यक्तीने मागे येऊन तोंड दाबले आणि माझ्या खिशातून 50 हजार रु.नगदी जबरीने हिसकावून नेले. अशी तक्रार त्यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे दिली होती. दरम्यान सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 470/2025 कलम 309(6)भारतीय न्याय संहिता अन्वये जबरीचोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने रामनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ गाठून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी गुप्त बातमीदार व तांत्रिक दृष्ट्या तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शेख जुबेर शेख कादर वयवर्ष 33,रा.रहेमतनगर चंद्रपूर,याला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली 50 हजारांची रोख रक्कम जप्त केली.सदर आरोपीला अवघ्या 24 तासाच्या आत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख,यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि.देवाजी नरोटे,सपोनि.हनुमान उगले, सपोनि.निलेश वाघमारे,पोहवा.पेतरस सिडाम,शरद कुडे, सचिन गुरनुले,आंनद खरात,प्रशांत शेंद्रे,लालू यादव,जितेंद्र आकारे,मपोहवा.मनिषा मोरे,पोअं.संदीप कामडी,पंकज ठोंबरे,सुरेश कोरवार,मपोअं.ब्युल्टी साखरे सर्व पो.स्टे. रामनगर,यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News....
@@@@@@@@@@@@@@@@@@@@