Chandrapur : अजय विजय माडोत वयवर्ष 30 रा.तांडा, भद्रावती हे परिवारासह बाहेरगांवी गेले असता 12 जून रोजी रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दरवाज्याची कडी तोडून घरातील लोखंडी कपाटातील लॉकर मधील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा एकुण 1 लाख,36 हजारांचा माल चोरून नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पोस्टेला अप.क्रं.266/ 2025,कलम 331(3)(4),305(अ)भारतीय न्याय संहिता अन्वये घरफोडीचा गुन्हा भद्रावती पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या माला व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी गुप्त बातमीदार व तांत्रिक दृष्ट्या तपास करून मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सोनू रामदास धारावत वयवर्ष 40 रा.बरांज मोकासा तांडा भद्रावती,याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागीने किं.1 लाख,35 हजारांचा माल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि गजानन तुपकर,सफौ.महेंद्र बेसरकर,पोहवा.अनुप आस्टुनकर,जगदीश झाडे,विश्वनाथ चुदरी,पोअं.खुशाल कावळे,योगेश घाटोळे सर्व पो.स्टे.भद्रावती यांनी केली आहे.
#Chandrapur Crime News..
@@@@@@@@@@@@@@@@