Bacchu Kadu Protest : प्रहार कार्यकर्त्यांचा अनोखा आंदोलन!| Marathi News...

News@Protest...

Gadchandur : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू,यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यासाठी गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनाचा शस्त्र उगरला आहे. आंदोलनाबाबत सरकारकडून कोणतेही पाऊले उचलली जात नसल्याने आता प्रहारचे कार्यकर्ते राज्यभर आक्रमक होताना दिसत आहे.इतर ठिकाणांसह कोरपना तालुका  येथील गडचांदूर शहरात देखील सरकारच्या विरोधात प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांच्या नेतृत्वात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करण्यात आला.यावेळी कोरपना तालुका प्रमुख विनोद शिंदे,सतीश शेरे,मनोज जरांगे पाटील समर्थक अभिमन्यू चव्हाण,प्रफुल देवलकर,इसाक बेग,गजानन पेंदोर,अनूप राखुंडे,सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड,महादेव बेरड, निलेश यांच्यासह प्रहार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी शासनाच्या विरोधात व बच्चू कडूच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

     'मागण्या मान्या न झाल्यास आंदोलन तीव्र करणार.'

    "मागील 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू! असे म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचे काम करत आहे.बच्चू कडू शेतकऱ्यांच्या, अपंगांच्या विविध मागण्यासाठी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत.त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन करणार? असा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी दिला आहे."

#Bacchu Kadu Protest...

           @@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-