Action by LCB Chandrapur : रेती तस्करीवर LCB ची कारवाई।Marathi News.

News@Sand Smuggling...

            Chandrapur : जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेल्या अवैधरीत्या रेती तस्करीवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,यांनी संपूर्ण पोलीस ठाणे प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखा(LCB)यांना निर्देशित केले.त्या अनुषंगाने LCB पोलीस निरीक्षक महेश  कोंडावार, यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या पथकाने मोहीम राबवून या आठवड्याभरात रेती भरलेले ट्रक व ट्रॅक्टरांवर धडाकेबाज कारवाया करून लाखोंच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले आहे.

                     'बघा कारवाईची मालिका'

 1) राजुरा पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 5 ट्रॅक्टर व चोरीची रेती,असा एकूण 37 लाख,19 हजार.

2) भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत 1 ट्रॅक्टर व चोरीची रेती,असा एकूण 6 लाख,60 हजार.

3) विरूर पोलीस स्टेशन अंतर्गत 1 ट्रक व चोरीची रेती असा एकूण 22 लाख,20 हजार.

4)पडोली पोलीस स्टेशन अंतरर्गत 1ट्रॅक्टर व चोरीची रेती असा एकूण 8 लाख,5 हजार.

असे 8 वाहने व चोरीची रेती,असा 74 लाख 4 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून रेती चोरी,गौण खनिज व महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार 11 वाहन चालक-मालकांवर संबंधित पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदरची धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार आणि LCB चे अधिकारी व अंमलदारांच्या वेगवेगळ्या पथकांनी केली आहे. कारवाईची मालिका सतत सुरू असल्याने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

        'जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन.'

आपापल्या परिसरात कुठेही अवैध रेती उत्खनन किंवा वाहतूक,तसेच इतर अवैध व्यवसायांबाबतची माहीती पोलीस नियंत्रण कक्ष तसेच डायल 112 या टोलफ्री क्रमांकावर कळवावी.असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

#LCB Chandrapur News...

#Major Action by LCB Against Chandrapur Sand Smuggling...

#Illegal Sand...

#Sand Smuggling...

#LCB Chandrapur...

   🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸