News@सन्मान कर्तुत्ववाचा...
Chandrapur : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी चंद्रपूर पोलीस मुख्यालय येथे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.याच श्रेणीत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक 'महेश कोंडावार' यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत राज्याचे मत्स्य व्यवसाय,वने व सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते कोंडावार यांना सन्मानचिन्ह व प्रशिस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक 'महेश कोंडावार' यांनी सण 2023 ला स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी स्वीकारली.तेव्हापासून मा.जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली मोठ्या शिताफीने व नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या टीमला सोबत घेऊन जिल्ह्यात घडलेल्या विविध गंभीर व गुंतागुंतीच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लावत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कोंडावार यांची आजपर्यंतची कामगिरी उल्लेखनीय व कौतुकास्पद ठरली असून याच कामगिरीची वरिष्ठ पातळीवरून दखल घेत यांना गौरविण्यात आले आहे.मित्रपरिवार व हितचिंतकांतर्फे पोलीस निरीक्षक कोंडावार, यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहे.
#Honoring LCB Police Inspector Mahesh Kondawar.
#Honored with a Certificate and Badge of Honor by the Guardian Minister...
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸