Terrible Accident in Gadchandur City : गडचांदूर शहरात भीषण अपघातात|Marathi News...

News@Accident...

    Gadchandur : येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या गेट पासून थुटराकडे जाणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगच्या ट्रक आणि पिकअपमध्ये अपघात झाला.दुर्दैवाची बाब म्हणजे या वाहनांच्या धडकेत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका निष्पाप महिलेचा नाहक बळी गेला.सदरची घटना 6 जून शुक्रवार रोजी पहाटे 5.30 च्या जवळपास घडली.लता मून वयवर्ष अंदाजे 50,वार्ड क्रं.3 गडचांदूर,असे मृत महिलेचे नाव असल्याचे कळते.सदर घटनेमुळे पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

    प्राप्त माहितीनुसार,सदर महिला,ही नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली.माणिकगड सिमेंट कंपनी समोरून थुटरा मार्गे एका बाजूने जात असताना समोरून ट्रक क्रं.AP/07/TF/9109 येत होता.हे पाहून सदर महिला रस्त्याच्या कडेला उभी एका पिकअप जवळ थांबली.मात्र, तो ट्रक थेट पिकअपला येऊन धडकला आणि पिकअपच्या बाजूला उभी महिलेवर पलटला.पिकअप खाली दबून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

          घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.दबून असलेल्या महिलेचा मृतदेह काढून ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.ट्रक चालकाला ताब्यात घेऊन संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

#Terrible accident in Gadchandur city...

#Woman dies in accident...

#Gadchandur...

#Korpana...

                                         ----------)(-----------:Advertisement:-