Korpana : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.दरम्यान राजुरा-गोविंदपूर 353-B हायवेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे हायवे लगतच्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या रस्त्यावरील कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात आणि नागरिकांना गावात जाण्यासाठी गावालगत रस्ते काढण्यात आले नाही,अशा विविध प्राप्त तकरींच्या पार्श्वभूमीवर राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे,हे अधिकाऱ्यांसोबत हायवे मार्गाची पाहणी करीत असताना दुर्गाडी फाट्यावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते.लोकांना मोठा त्रास होत आहे, तरूण दारुच्या आहारी जात आहे,दारुड्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार भोंगळे हे लगेच रस्त्या लगतच्या अवैध दारू विक्रेत्याच्या दुकानात गेले आणि स्वतः समोर राहून कार्यकर्त्यांना दारू काढण्यास सांगितले,तेव्हा आतमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी कचऱ्यामध्ये लपवून ठेवलेल्या दारूच्या तीन पेट्या बाहेर काढल्या.आमदार भोंगळे यांनी कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत,यांना जागेवर बोलावून चांगलेच धारेवर धरले.'या पुढे फाट्याजवळ दारू विक्री होणार नाही' अशी तंबी दिली व विक्रेत्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.राजुरा विधानसभाच्या इतिहासात ही पहिली घटना असून आजपर्यंत कोणत्याही आमदाराने जे केला नाही,आमदार देवरावदादा भोंगळे करून दाखवत आहे.हे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद असून 'आगे आगे देखो होता है क्या' असे मत व्यक्त होत आहे.
'कोरपना पो.स्टे.हद्दीतील अवैध दारू विक्री.'
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कोरपना पोलीस स्टेशन हद्दीतील नारंडा,कोरपना,थिपा,कान्हाळगाव,लोणी, धानोली तांडा,टांगाडा,सोनुर्ली,चनई,मांडवा,पारडी, परसोडा,तांबाडी फाटा,कुसळ,येरगव्हन,सावलहिरा, कोठोडा,वनोजा,गांधीनगर,जेवरा.या गावात सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असल्याचे कळते.आमदार भोंगळे यांनी स्वतः दारू पकडल्यानंतर कोरपना पोलीस व एक्साईज डिपार्टमेंटच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.सध्या अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून सदर घटनेमुळे कोरपना पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर आळा बसेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
#Korpana Police Station Crime Riport...
#Excise Department...
#MLA Devraodada Bhongale Caught illegal Liquor....