Murder! Son-in-law Murdered Father-in-law : जावयाच्या हातून सासऱ्याचा खून|Marathi News...

News@Murder...

                 Chandrapur-Warora : जावयाने आपल्या वृद्ध सासऱ्याला काठीने मारहाण करून खून केल्याची घटना 21 मे रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास वरोरा येथे घडली.मुकुंदा हनुमंत देवकर वयवर्ष 70,असे मृत सासऱ्याचे नाव तर दासा लक्ष्मण इटकर वयवर्ष 37,असे आरोपी जावयाचे नाव आहे.दोन्ही सरदार पटेल वार्ड वडारपूरा वरोरा,याठिकाणी राहतात.

    मिळालेल्या माहितीनुसार,जावई आणि सासऱ्याचे कुटुंब एकाच घरात राहतात.आरोपी जावई कोणताही कामधंदा करत नाही,नेहमी मुलीसोबत भांडण करायचं,मुलीला त्रास देऊ नको,असे सासरे म्हणायचे.दरम्यान आरोपीने रागाच्या भरात वृध्द सासऱ्याला काठीने जबर मारहाण केली.या मारहाणीत मृतक गंभीर जखमी झाला.जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.आरोपी जावयाला अटक करण्यात आली असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

#Crime...

#Murder case in Warora,Chandrapur District...

#Son-in-law Murdered Father-in-law...

                                         ----------)(----------