Crime : अल्पवयीन मुलीकडुन देह व्यापार!|Marathi News...

News@Crime..

Chandrapur : चंद्रपूर शहर ठाण्यातील पोलिसांना 13 मे रोजी गुप्त माहिती मिळाली की,स्थानिक गौतम नगर महाकाली वार्ड,येथे एका ठिकाणी अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करून घेतला जात आहे.या माहितीवरून सदर ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता तेथे पोलिसांना एक मुलगी दिसून आली.तिची विचारपूस केली असता,ती 17 वर्षाची असून सदर खोली अमीना नावाच्या महिलेची असल्याचे तसेच तिच्या सांगण्यावरून देह व्यापार करीत असल्याचे तिने सांगितले.यावरून अमीना सैय्यद या महिलेविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोउपनि.संदीप बच्छिरे,मपोहवा.भावना रामटेके, पोहवा.सचिन बोरकर,संतोष कनकम,संजय घोटे,नापोअं. कपूरचंद खैरवार,पोअं.इमरान खान,इरशाद खान,दिलीप कुसराम,राजेश चिताडे,विक्रम मेश्राम,रुपेश पराते,मपोअं. सारीका गौरकार,दिपीका झिंगरे यांनी केली आहे.

#Chandrapur Crime Riport...

                                        ----------()----------