Chandrapur : जिल्ह्यातील विविध बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणारी महिलांची टोळी सक्रिय असून कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असल्याचे चित्र आहेत.याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मूल बसस्थानक परिसरात 6 मे रोजी सकाळी जवळपास 10,45 च्या दरम्यान एका महिलेच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला.सदर प्रकरणी मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती.
प्राप्त माहितीनुसार,फिर्यादी महिला,ही घटनेच्या दिवशी सकाळी मुल बसस्थानक येथे प्रवाशांच्या गर्दीत बसमध्ये चढून आत गेली असता गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोराने तिच्या गळ्यातील 10 ग्रॅम सोन्याची चैन चोरी केली.महिलेच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यावरून मुल पोलीस बसस्थानक परिसरात सतत लक्ष ठेवत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा शोध घेत होती. दरम्यान 3 मे रोजी पेट्रोलींगवर असतांना सौ.जमुना हितेश उर्फ संदिप नाडे उर्फ वाघमारे 35,सौ.लक्ष्मी जगनू मानकर 40,दोन्ही रा.रामेश्वरी टोली,ता. नागपूर यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण व तांत्रीक पद्धतीने तपास केला असता सदर महिलांच्या विरोधात नागपूर,चंद्रपूर,वर्धा, गडचिरोली,अमरावती तसेच हैदराबाद येथील विविध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातंर्गत बसस्थानक परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळले.
सदर महिलांकडे बारकाईने विचारपूस केली असता,त्यांनी 6 आणि 20 मे रोजी मूल बस स्थानकावरून प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबूली दिली.पोलिसांनी त्यांच्याकडून 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 2 लाख,50 हजारांचा माल जप्त करून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात पोउपनि.भाऊराव बोरकर,पोहवा भोजराज मुडरे,ज़मीर खान पठाण,नापोअं.चिमाजी देवकते,पोअं.नरेश कोडापे, मपोहवा.सिमा निषाद सर्व मूल पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
"नागरिकांना आवाहन"
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,बसमध्ये चढत उतरत असतांना आपले दागिने व मोबाईलची निट काळजी घ्यावी.शक्यतो प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने घालण्याचे टाळावे.
#Chandrapur District Crime News....