Truck Accident : ट्रक-काळी पिवळीचा अपघात : Marathi News...

News@Accident...

 Chandrapur : प्रवाशी घेऊन सिंदेवाहीवरून मूलकडे येत असलेल्या काळी-पिवळी नंबर MH/34/U/2396,ची विरूद्ध दिशेने येत असलेल्या ट्रक नंबर MH/40/BL/ 8524,ला धडक बसली.या अपघातामध्ये काळी-पिवळी वाहन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले आहेत.जखमीतील एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.सदर दुर्दैवी घटना 13 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली.

     मृतकांमध्ये वाहन चालक निर्दोष प्रभाकर मोर्हुले वयवर्ष 35 रा.राजोली व मनाबाई देवाजी डांब वयवर्ष 75 रा. सरळपाळ,यांचा समावेश आहे.जखमीमध्ये शंकर श्रावण चापले भेंडाळा,अंजनाबाई नीलकंठ आभारे रा.उसेगाव, संदीप सूर्यभान आमले नागपूर,रामदास हजारे रा. जयरामपूर,मारुती देवावार रा.जयरामपूर,शोभा मोहरल वयवर्ष 40 मोरवाई ता.मूल,उज्वला राऊत वयवर्ष 31 मोरवाही ता.मूल,पूजा गेडाम वयवर्ष 27 राजोली,मारुती वाघाडे,रा.हळदी ता.मूल,आनंदाबाई भगत रा.हिरापूर, रुजवान राकेश जुमडे रा.सिंदेवाही,शितल राकेश जुमडे आदी जखमींची नावे आहेत.जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास सुरू आहेत.

#Accident News...

#Truk Accident in Chandrapur District...

                                        ----------()----------