Chandrapur-Sindewahi : उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामिण भागात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असते.यासाठी गावालगतच्या जंगलात नागरिक जात असतात.सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल,येथील महिला तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या असता एका पट्टेदार वाघाने हल्ला करून 3 महिलांना ठार केल्याची खळबळजनक घटना 10 मे शनिवार रोजी घडली.रेखा शालीक शेंडे वयवर्ष 55,शुभांगी मनोज चौधरी वयवर्ष 33,कांता बुधा चौधरी वयवर्ष 60 रा.मेंढा(माल)अशी मृतक महिलांची नावे असून वंदना विनायक गजभिये वयवर्ष 50 रा.चारगाव बडगे,ही महिला जखमी झाली आहेत.या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यात शोककळा पसरली असून दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चारगाव–मेंढा जंगल परिसरातील डोंगरगाव बिटातील कम्पार्टमेंट नं.2355 मध्ये तेंदुपत्ता संकलनासाठी काही महिला गेल्या होत्या.यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला करून या 3 महिलांना ठार केले.दर हंगामात गोरगरीब महिला तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात जातात.यंदाही चारगाव बडगे आणि मेंढा माल,येथील महिला गावालगतच्या कारगाटा ठकाबाई तलाव जंगल परिसरात तेंदुपत्ता तोळण्यासाठी सकाळी गेल्या असता जंगलात दबा धरून बसलेल्या एका पट्टेदार वाघीणीने त्यांच्यावर हल्ला केला.जखमी वंदना गजभिये हीला उपचारिसाठी पाठविले.त्यानंतर इतरही महिला जंगलात गेल्या होत्या,त्या गावात परत न आल्याने याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.वनविभाग,पोलीस व नागरीकांच्या मदतीने जंगलात शोधाशोध केली असता दुपारी 3 च्या सुमारास तिनही महिला वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळल्या.सदर घटनेची माहिती गावात पोहोचताच शोककळा पसरली.मृतक रेखा शेंडे,हिला पती 2 मुले तर शुभांगी चौधरीला पती 1 मुलगा आणि 1 मुलगी तर कांता चौधरीला 1 मुलगा,असा आप्त परिवार आहे. यातील शुंभागी आणि कांता एकाच कुटूंबातील सासू,सुना असल्याचे कळते.हल्लेखोर वाघीण आपल्या 2 बछड्यांसह या भागात वावरत असल्याचे बोलले जात आहे.सदर घटनेचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.
#3 Woman Killed in Tiger Attack...
#Tiger Attack News...
#Chandrapur...
#Sindewahi...