Gadchandur : गडचांदूर शहरात सध्या विकास कामांचा झंझावात सुरू असून राजुरा विधानसभेचे धडाकेबाज आमदार देवरावदादा भोंगळे,यांच्या शुभहस्ते येथील विविध वार्डात विविध कामांचे भूमिपूजन पार पडत आहे. आगामी काळात शहराचा चेहरामोहरा बदलणार यात काही शंका नाही.याच पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी नगर परिषद हद्दीतील लखमापूर मार्गावर स्थित मुस्लिम समाज बांधवांच्या ईदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार देवरावदादा भोंगळे, यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रफ़िक निज़ामी, मेहताब सर,साहेब अली ठेकेदार,अज़ीज़ कुरेशी,बिराम कुरेशी,अन्सारी,अमान निज़ामी,शेख जावेद,बशीर भाई वेल्डिंग वाले,सलीम मिडिया,इतर मुस्लिम बांधवांसह भाजपच्या विविध आघाडीतील महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
'मुस्लिम बांधवांनी व्यक्त केले मत.'
गेल्या कित्येक वर्षांपासून ईदगाहकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता,संरक्षक भिंत नव्हती,घाणीचे साम्राज्य पसरले होते,यामुळे येथे नमाज पठणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.सदर समस्याबद्दल अनेकदा नगर परिषदेला साकडे घालण्यात आले.मात्र,समाधानकारक काहीही घडले नाही.मुख्य म्हणजे आजपर्यंत बरेच आमदार,खासदार होऊन गेले. परंतू,एकानेही याकडे लक्ष देण्याचे सौजन्य दाखवले नाही? शेवटी सदर समस्या माजी नगरसेवक अरविंद डोहे यांच्या निदर्शनास आणून दिली.भाऊंनी तात्काळ याकडे जातीने लक्ष देऊन नगर परिषदेच्या माध्यमातून संरक्षक भिंत व सौंदर्यीकरण करून दिले.आणि ईदगाहला खरे स्वरूप प्राप्त झाले.दरम्यान दोन महिन्यांपूर्वी रमज़ान ईदच्या दिवशी आमदार देवरावदादा भोंगळे यांनी थेट ईदगाह येथे येऊन उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत 'येत्या दोन महिन्यात ईदगाहकडे येणाऱ्या रस्त्यावरील पुल व नालीचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते' त्याच कामाचे आज भुमिपुजन पार पडले आहे.'एकच वादा,देवरावदादा' असे बोलले जाते,याची जाणीव आज आम्हाला झाली.असे आपूलकीचे मत यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी व्यक्त केले,सोबतच आमदार देवरावदादा भोंगळे यांचे मनापासून आभार मानले आहेत.
#MLA Devraodada Bhongle News...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@