Water Problem : गडचांदूरातील वार्ड नं.4 येथे पाणी पाईप लाईनचे काम शेवटच्या टप्प्यात|Marathi News...

News@Water Problem...

Gadchandur : नगर परिषद वार्ड नं.4 प्रभाग क्रं.8,अमल नाला रोड परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने गेल्या 5 वर्षापासून पाण्याची पाईप लाईन टाकण्याची मागणी सातत्याने सुरू होती.परंतू, सत्ताधारी सदर समस्या मार्गी लावण्यास असमर्थ ठरले? दरम्यान कार्यकाल संपल्याने जूनी बॉडी पायउतार झाली आणि सध्या याठिकाणी फेब्रुवारी 2025 पासून प्रशासक बसले आहे.असे असताना 4 मार्च 2025 रोजी वार्डातील महिलांनासोबत घेऊन शहराध्यक्ष अरविंद डोहे,कोरपना तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,माजी नगरसेवक रामा मोरे,हरीश घोरे,शंकर आपूरकर व भाजप महिला आघाडी शहर महामंत्री सौ.नमीता बिश्वास,यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकारी चव्हाण,यांची भेट घेऊन सदर समस्यांबाबत निवेदन दिले होता.येत्या 8,10 दिवसात पाईप टाकून पाण्याची व्यवस्था न झाल्या आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता.

      सदर निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत नवनियुक्त मुखाधिकारी,यांनी एका आठवड्यात पाईप लाईन टाकू, तोपर्यंत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जातील,असे आश्वासन दिले होते.आणि लगेच पाण्याचे टॅंकर चालू सुद्धा केले व 1 हप्त्यानंतर त्या परिसरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू केले.काही ठिकाणी तात्पुरते नळाचे पाईंट देण्यात आले असून सदर काम शेवटच्या टप्प्यात आहे.सदर कामामुळे भविष्यात होणारी भीषण पाणीटंचाई पासून मुक्तता मिळणार,असे मत व्यक्त करत वार्डातील नागरिकांनी अरविंद डोहे,सतीश उपलेंचवार,रामा मोरे यांच्यासह उपस्थित सर्व भाजप मंडळीचे,विशेषतः नमीता बिश्वास यांचे मनापासून आभार मानले आहेत.असे असताना मात्र,शहरातील काही संधीसाधू तथाकथित नेते पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात असताना,मीच येथील पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यास सांगितले होते.असे सांगून लोकांची दिशाभूल करत श्रेय लाटण्याचा केवीलवाना प्रयत्न करीत असल्याचे पहायला मिळत आहे. कुणी कितीही केलं तरी, 'ये तो पब्लिक है,सब जाणती है.' असे या निमित्ताने म्हटले तर वावगे ठरणार नाही.

#Gadchandur City Water Problem... 

                                   -------------::----------