Chandrapur : दुचाकी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील एका अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 4 लाख,90 हजार रु. किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 9 दुचाकी LCB पथकाने हस्तगत केल्या आहेत.मिलींद जयभारत डंभारे वयवर्ष 32 रा.लोणी,ता.कोरपना,असे आरोपीचे नाव असून चंद्रपूर बंगाली कॅम्प चौकातून याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.याच श्रेणीत 30 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की,एक इसम त्याच्या ताब्यातील विना कागदपत्र तसेच विना नंबरची मोटार सायकल विक्रीसाठी बंगाली कॅम्प चौकात ग्राहकांच्या शोधात फिरत आहे.या माहितीवरून LCB पथकाने सापळा रचून आरोपी मिलिंदला सदर ठिकाणा वरून ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याच्या कडून वेगवेगळ्या ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकूण 9 मोटारसायकल तसेच मोपेड गाड्या मिळून आल्या.सदर आरोपीवर रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर,शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर,राजुरा पोलीस स्टेशन तसेच हिगनघाट पोलीस स्टेशन,असे एकूण 6 गुन्हे तसेच चंद्रपुर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.मधुकर सामलवार, पोउपनि.सुनिल गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार,पोहवा. सतीश अवथरे,पोहवा.रजनीकांत पुठ्ठेवार,पोहवा.दिपक डोंगरे,पोअं.प्रशांत नागोसे,पोअं. किशोर वाकाटे,पोअं. शशांक बदामवार,पोअं.अमोल सावे,पोअं.प्रमोद कोटनाके यांनी केली आहे.
#A motorcycle Thief was Arrested by the LCB Team...
#Action by Local Crime Branch Chandrapur...