Taluka level Science Exhibition : तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन । Marathi News.

News@Science Exhibition...

            Rajura : राजुरा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने स्टेला मॅरीस CBSE स्कूल राजुरा येथे 6,7 आणि 8 जानेवारी दरम्यान 52 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 चे आयोजन करण्यात आले.या कालावधीत शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान,या मुख्य विषयावर सदर प्रदर्शन संपन्न होत आहे. विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे होते तर राजेश पातडे शिक्षण अधिकारी(माध्य.)जि.प. चंद्रपर,अश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी(प्राथ.) जि.प.चंद्रपूर,फादर बेनी मुलक्कल(व्हिकर जनरल आॕफ चांदा डायोसिज),सिस्टर ग्रेस मारीया(मॅनेजर,स्टेला मॅरीस CBSE स्कुल राजुरा,यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

दोन दिवसाच्या विविध कार्यक्रमानंतर तिसऱ्या दिवशी प्रतिकृतीचे मुल्यमापन,बक्षीस व समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन राजकुमार हिवरे प्राचार्य जि.शि.व प्र.सं.चंद्रपूर,यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राजुरा पं.स.सह गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे तर प्रमुख अतिथी म्हणून राजुरा पं.स.चे कृषी अधिकारी नरेश ताजणे,हे असणार आहे.

#Taluka level 52nd science exhibition...

     🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹🔺🔹