"नेमकं काय घडलं सभागृहात?"
मंत्री राठोड यांचे उत्तर ऐकून मुनगंटीवार म्हणाले,“नाल्याची जितकी नैसर्गिक रुंदी आहे,तितकीच राहिली पाहिजे, याची खबरदारी शासन घेणार आहे का?" यावर मंत्री राठोड केवळ 'सजेशन फॉर ॲक्शन(यावर विचार करू,किंवा सल्ला ऐकला असून त्यावर कार्यवाही करू)एवढेच उत्तर दिले.यावर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली.
“दादा कोंडकेंसारखं उत्तर देताय?"
सुधीर मुनगंटीवार म्हणाले,“मंत्री राठोड आमचे मित्र आहेत. मात्र, नाल्याची नैसर्गिक रुंदी कायम राहील का? असा माझा प्रश्न होता त्यावर त्यांनी 'सजेशन फॉर ॲक्शन' एवढंच उत्तर दिलंय.हे ॲक्शन,ओन्ली ॲक्शन,नो रिॲक्शन,असा असला पाहिजे.मंत्र्यांकडून अपेक्षित आहे की,नाल्याची नैसर्गिक रुंदी काय राहिली पाहिजे.त्यांच्या कडून हमी यायला हवी की,नाल्याची नैसर्गिक रुंदी तशीच ठेवली जाईल.ती हमी न देता सजेशन फॉर ॲक्शन,हे काय उत्तर आहे? हे तर द्वीअर्थी उत्तर झाले. हे काय दादा कोंडकेंचा उत्तर आहे? हे द्वीअर्थी आहे का? त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या." सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजी नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री संजय राठोड यांना सूचना केली की मुनगंटीवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी.
#Sudhir Mungantiwar Vs Sanjay Rathod...
#Sudhir Mungantiwar Vs Sanjay Rathod,Over Grain Widening...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@