Mumbai : "कशासाठी आणि कोणासाठी? यांनी फक्त चाचपडून पाहिला.मुंबई स्वतंत्र करता येते का? यासाठी भाषेला डिवचून बघू.महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू.कुणाची माय व्यालीय,त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा! मुंबईला हात घालून दाखवा.मजाक वाटला का? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत," असे राज ठाकरे म्हणाले.ते 5 जून रोजी मुंबई येथे आयोजित विजय मेळाव्यात बोलत होते.काय म्हणाले राज ठाकरे.
महाराष्ट्र ज्यावेळी पेटून उठते,त्यावेळी काय घडते हे आज राज्यकर्त्यांना समजले असेल. 'राज ठाकरे.'
“महाराष्ट्र ज्यावेळी पेटून उठते,त्यावेळी काय घडते हे आज राज्यकर्त्यांना समजले असेल.त्याशिवाय का माघार घेतली? विनाकारण आणलेला विषय होता.हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास आहेत,हिंदी न बोलणारी राज्ये आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत...आणि वर आम्ही हिंदी शिकायचा.यांना राज्यांचा विकास करता आला नाही. कोणसाठी हिंदी शिकायचा? पाचवीनंतर पोरगा हिंदी चित्रपटसृष्टीत जाणार का”, असे राज म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे इंग्रजी मीडियामध्ये शिकले,त्यांच्या मराठीबाबत शंका घेऊ शकता का? 'राज ठाकरे.'
आम्ही मराठी मीडियात शिकलो,हो शिकलो.आमची मुले इंग्रजी मीडियममध्ये शिकली.होय.मग यांना मराठीचा पुळका कसा? बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत.या दोघांवर मराठी बाबत शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा.त्यांना कोण विचारत नाही.उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे?, असा सवाल राज ठाकरेंना केला.
तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती...रस्त्यावर.'राज ठाकरे.'
“खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. गरज नव्हती.कुठून हिंदीचा आला ते कळला नाही.हिंदी,कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी.लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही.कुणाला विचारायचा नाही.शिक्षण तज्ज्ञांना विचारायचा नाही.आमच्याकडे सत्ता आहे.आम्ही लादणार, तुमच्याकडे सत्ता असेल ती विधान भवनात.आमच्याकडे सत्ता आहे.ती रस्त्यावर,” असे राज ठाकरे म्हणाले.
माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी. 'राज ठाकरे.'
“आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळा सुरू होईल.काय वाटता,दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती.कोणी कमी हसला का? बोलतायत का? आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना.आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती.आताही तिच आहे.कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा.माझ्या मराठीकडे,महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचा नाही कुणी,” असे राज ठाकरे म्हणाले.
जे बाळासाहेबांना जमला नाही,अनेकांना जमला नाही,ते फडणवीसांना जमला. 'राज ठाकरे.'
कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.जे माननीय बाळासाहेबांना जमला नाही,एक जे अनेकांना जमला नाही...आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा.. ते देवेंद्र फडणवीसांना जमला,असे राज ठाकरे म्हणाले.
'राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात.'
“खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता.पण नुसता मोर्चाच्या चर्चेनंतर माघार घ्यावी लागली.आजचा हा मेळावा शीवतीर्थावर मैदानात व्हायला हवा होता.मैदान ओसंडून वाहिला असता.मी बाहेर उभे असलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो,” असे राज ठाकरे म्हणाले.
'18 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकाच मंचावर.'
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले आहे. ठाकरे बंधूंनी मंचावर एकत्र एण्ट्री केली.18 वर्षांनंतर दोघं एकत्र आले.
'विजयी मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंमध्ये चर्चा.'
उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या व्हिआयपी रुममध्ये गेले. याठिकाणी दोघांनी संवाद साधला.विजयी मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली.ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याला महाराष्ट्राच्या राज्यगीताने सुरुवात झाली.
#Raj Thackeray News...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@