Chandrapur : जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार 1 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा(LCB),चंद्रपूरचे पथक पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत अवैध धंद्यांविरुध्द कारवाईसाठी पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन कळमना गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली.दरम्यान एक महिन्द्रा स्कॉपिओ क्रं.MH/34/CJ/6576,ला थांबवून पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता,त्यामध्ये अवैध रित्या देशी विदेशी दारु साठा मिळून आला.तसेच सदर गुन्ह्यात पायलेटींगसाठी वापरलेला वाहन टाटा अल्ट्रोझ क्रं.MH/34/CJ/7337,चा चालक वाहन सोडून पळून गेला.
यावरून सदर प्रकरणी पो.स्टे.बल्लारपूर येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नितीन राजन कुंडे वयर्ष 35 रा.राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर,याला अटक करून देशी दारू राॅकेट संत्रा 90 MLच्या 3 हजार 800 नग निपा किं.1 लाख 33 हजार,बिअर हायवर्ड 5000 च्या 73 टिन किं.9 हजार 360,विदेशी दारू ईम्पेरिआल ब्ल्यूच्या 48 नग निपा किं.8 हजार 160,महिन्द्रा स्कार्पिओ वाहन क्रं.MH34/CJ/6576 किं.15 लाख,टाटा अल्ट्रोझ क्रं.MH/34/CJ/7337 किं.7 लाख,असा एकूण 23 लाख, 50 हजार,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाहीजे असलेला आरोपी नामे सिध्दार्थ उर्फ बापू भास्कर रंगारी रा.कारवा रोड,रविंद्रनगर वार्ड बल्लारपूर याचा शोध घेणे सुरू आहे.गुन्ह्याचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कॉक्रेडवार,सफौ.स्वामीदास चालेकर,पोहवा.किशोर वैरागडे,अजय बागेसर,प्रमोद कोटनाके,पोअं.शेखर माथनकर,गोपीनाथ नरोटे,सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
#LCB Action Against illegal Domestic and Foreign Liquor Trafficking...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@