Gadchandur : मुंबई येथे झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत कार्यरत 27 मंडळांसाठी नवीन मंडळ अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली.नव्या यादीची अधिकृत घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी जाहीर केली असून कोरपना तालुकाध्यक्षपदी संजय मुसळे आणि गडचांदूर शहराध्यक्षपदी अरविंद डोहे यांची फेरनिवड करण्यात आली आहेत.संजय मुसळे आणि अरविंद डोहे,यांनी स्थानिक ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात व सहकार्यांच्या मदतीने पक्षवाढीसाठी केलेल्या कामांची,ही पावतीच म्हणावी लागेल,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. "पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,आमदार देवरावदादा भोंगळे,ज्येष्ठ,वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकारी मित्रांच्या सहयोगाने जनतेच्या सेवेत राहून त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत राहू'' असे मत मुसळे आणि डोहे यांनी व्यक्त केले आहेत.
'भाजप जिल्हा ग्रामीण मंडळ अध्यक्षांची नावे.'
त्याच प्रमाणे यामध्ये बल्लारपूर शहर ॲड.रणन्जय सिंह, बल्लारपूर ग्रामीण चंद्रकांत(पिंटू)देऊळकर,मूलल शहर प्रवीण मोहुर्ले,मूल ग्रामीण चंदू मारगोनवार,दुर्गापूर-उर्जानगर,श्रीनिवास जनगमवार,पोंभुर्णा हरी ढवस, गोंडपिपरी दीपक सातपुते,राजुरा शहर सुरेश रागीट,राजुरा ग्रामीण वामन तुराणकर,जिवती दत्ता राठोड,कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे,गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद डोहे,नंदोरी-मुधोली दयानंद जांभुळे,वरोरा शहर संतोष पवार,नागरी-सालोरी राजेंद्र सवई,भद्रावती शहर सुनील नामोजवार,शबोर्डा-आबामक्ता वंदना दाते,घोडपेठ-पाटाळा श्यामसुंदर उरकुडे,अर्हेरनवरगाव सुधीर दोनाडकर, तळोधी हेमराज लांजेवार,नागभीड संतोष रडके,चिमूर गजानन गुडधे,भिसी-नेरी मनीष तुम्पलीवार,सावली-किशोर वाकुडकर,ब्रह्मपुरी शहर सुयोग बाळबुधे,ब्रह्मपुरी ग्रामीण ज्ञानेश्वर दिवटे,सिंदेवाही नागराज गेडाम,यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाची विचारधारा जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन टीम प्रभावी कार्य करेल. असा,विश्वास जिल्हाध्यक्ष शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
#Chandrapur District BJP....
#BJP Chandrapur District Rural Mandal Presidents names announced....
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@