Arnav Pathrikar Honored in Delhi : महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर,सौ.प्रतिभा पाथ्रीकर,ह.मु.अकोला,यांचा नातू अर्णव अभिषेक पाथ्रीकर प्रभात किड्स अकोला,येथील फर्स्ट स्टॅंडर्डचा विद्यार्थी,याने "स्पेल वेल इंडिया" या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम येण्याचा मान पटकाविला असून तो चॅम्पियन ठरला आहे.आय.आय.सी.दिल्ली,येथे नुकताच स्पेल वेल इंडियाचे मान्यवर संचालक यांचे हस्ते एका शानदार सोहळ्यात त्याचा गौरव करण्यात आला.सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र,8 हजार रुपये रोख,असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अर्णव हा माहेर कलेक्शनचे संचालक अभिषेक पाथ्रीकर, सौ.रेणू पाथ्रीकर यांचा मुलगा तसेच सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर,सौ.प्रतिभा पाथ्रीकर,जे.टी.कराळे, अकोला यांचा नातू आहे.स्कुल ऑफ स्कॉलर्स च्या प्राचार्या मनीषा उंबरकर,प्रभात किड्स चे संचालक डॉ.गजाननराव नारे यांनी अभिनंदन केले आहे.अर्णव चे सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे.
#Arnav Pathrikar Honored in Delhi...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@