Gadchandur : हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात 21 ते 23 जून दरम्यान झालेल्या 'अखिल भारतीय युवा खेळ राष्ट्रीय अजिंक्यपद 2025' मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका,येथील 'अंबुजा विद्या निकेतन' शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहेत.यामध्ये सदर शाळेतील एकूण 17 मुले व 1 मुलगी,यांनी सहभाग नोंदविला होता.त्यापैकी 17 मुलांची 29 मार्च रोजी भंडारा येथे 'खेलो इंडिया युवा खेळा'साठी निवड झाली होती.
19 वर्षांखालील फुटबॉल संघाने कर्नाटकविरुद्धच्या उपांत्य सामन्यात महेंद्र पाल,यांनी केलेल्या 1गोलने विजय मिळवला तर आर्यन बोरीकरच्या गोलने उत्तराखंडवर 2-0, असा विजय मिळवत अंतिम फेरीत विजेता ठरला.यावेळी महाराष्ट्र संघाचा कर्णधार सूरज पासवान होता.19 आणि 17 वर्षांखालील बुद्धिबळात आणि 9 वर्षांखालील स्केटिंगमध्ये अंबुजा विद्या निकेतनने प्रथम क्रमांक पटकावला.यामध्ये फरदीन खान(19 वर्षांखालील बुद्धिबळ),पुष्पराज अंभोरे,(17 वर्षांखालील बुद्धिबळ) आणि कार्तव्य काकडे(स्केटिंग),यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.फुटबॉल संघात महेंद्र पाल,सूरज पासवान, भाविक मोडक,आर्यन बोरीकर,जय कौरसे,राम मट्टे,अंकित सिंग,निशांत संथारा,विवेक बारी,भार्गव थिपे,गौरव वडस्कर,प्रशिक पजारे,अमन देशलहरे,आयुष धाकरे,यांचा समावेश होता.
'बक्षीस वितरण'
बक्षीस वितरण जगमेंदर पांचाळ(हरियाणा स्पोर्ट्स स्कूल) आणि बाटी थरडे(युवा खेळ महासंघ)यांनी केले. महाराष्ट्र युवा खेळांचे सरचिटणीस सुनील पंचबुद्धे,यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.
'तज्ञांचे मार्गदर्शन'
एव्हीएन शारीरिक शिक्षण शिक्षक हेमंत झंगेल आणि संतोषी खेवले यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद होती.राष्ट्रीय स्तरावर अंबुजा विद्या निकेतन आणि महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावल्याबद्दल मुख्याध्यापक राजेश शर्मा,समन्वयक अंबर त्रिवेदी, यांच्यासह शाळेतील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
#Youth Games All India National Championship 2025...
#Ambuja Vidya Niketan School...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@