"Shocking" Teacher Commits Suicide in Classroom : मधल्या सुट्टीत शिक्षकाची वर्गात गळफास घेऊन आत्महत्या!|Marathi News...

News@Suicide... 

Teacher Commits Suicide in Classroom Jalgaon : जिल्ह्यातील पाचोरा शहरात एका खासगी प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने 25 जून बुधवार रोजी वर्गात विद्यार्थी नसताना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शिक्षकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.Suicide News. 

             देशमुखवाडी परिसरात असलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या सुपडू भादू विद्यामंदिर,या शाळेत रवींद्र महाले वयवर्ष 42,हे शिक्षक म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होते.बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाल्यावर महाले यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. दरम्यान,साडेनऊच्या सुमारास मधली सुटी झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना वर्गा बाहेर पाठवले.त्यानंतर वरच्या मजल्यावरील एका वर्ग खोलीची आतून कडी लावून घेत छताला दोरी बांधून गळफास घेतला.मधल्या सुट्टीनंतर परतलेल्या काही विद्यार्थ्यांनी दरवाजा न उघडल्याने वर्गात डोकावून पाहिल्यानंतर त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतील शिक्षकाचा मृतदेह दिसून आला.विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून घडलेली घटना इतर शिक्षकांना सांगितली.शिक्षकाने वर्गात गळफास घेतल्याची माहिती मिळताच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाघ,संचालक स‍तीश चौधरी,वासुदेव महाजन, भूषण वाघ,भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड यांनी तातडीने शाळेला भेट दिली.

          पोलीस निरीक्षक अशोक पवार,सहाय्यक निरीक्षक संजय निकुंभ,उपनिरीक्षक कृष्णा घायळ यांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात रवाना केला.दहिगाव संत येथील मूळ रहिवासी असलेले शिक्षक रवींद्र महाले हे सध्या पाचोरा शहरातच वास्तव्यास होते.त्यांनी असे अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला.शिक्षक महाले यांनी मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून,त्यादृष्टीने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.शिक्षक महाले यांच्या मागे वडील, आई,पत्नी, मुलगा,मुलगी,भाऊ आणि बहीण,असा परिवार आहे.

#Suicide News...

#Teacher Commits Suicide in Classroom in Jalgaon District...

   @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-