Right to Information Act : माहितीचा अधिकार अधिनियम 2005,हा एक भारतीय कायदा आहे.जो नागरिकांना सरकारी माहिती मिळवण्याचा अधिकार देतो. माहिती अधिकार कायद्यात, माहितीसाठी अर्ज केल्यानंतर ठराविक दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. पण,अनेकदा ही अट पाळली जात नाही,आणि लोकांना वेळेवर माहिती मिळत नाही.याचे जिवंत उदाहरण म्हणजे गडचांदूर नगर परिषद! याठिकाणी माहिती अधिकार कायद्याची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे आरोप होत असून वेळेवर माहिती मिळत नसल्याने अर्जदाराला नाईलाजास्तव अपीलचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. Right to Information Act.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगर परिषदेत सध्या प्रशासन राज आहे.शहरात करोडोंची विविध विकास कामे सुरू आहेत.या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याची शंका असल्याने 'एप्रिल 2025 पासून गडचांदूर शहराच्या विविध प्रभागातील नाली,रोड व इतर कामांचे इंस्टिमेट,वर्क ऑर्डर व शासकीय मान्यता' याची माहिती मिळावी म्हणून 'माहिती अधिकार कायद्यांतर्गत' अर्ज करण्यात आला. ठराविक दिवसांच्या आत माहिती देणे अनिवार्य होते.मात्र, संबंधीताकडून माहिती देण्यात टाळाटाळ होत आहे. 'कारभारात पारदर्शकता असेल तर माहिती देण्यात टाळाटाळ का केली जात असावी?' असे एकना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे.एकीकडे शहरातील नागरिक विविध समस्यांना घेऊन बोंबाबोंब करत आहे.तर, दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी,हे ठेकेदारांची जी हुजुरी करत यांना विशेष ट्रिटेमेंट देत असल्याचे आरोप होत आहे. Right to Information Act.
वेळेवर माहिती मिळत नसल्याने नाईलाजास्तव संबंधीत अर्जदाराला अपीलीय अधिकाऱ्याकडे दाद मागावी लागत असून निर्णयाच्या प्रतिक्षेत ताटकळत बसावे लगत आहे. अपील केल्यानंतरही मागीतलेली माहिती व्यवस्थितपणे मिळेल? की,पुन्हा वरच्या पातळीवर अपील दाखल करावी लागेल,याची खात्री नसल्याचे बोलले जात आहे.याठिकाणी माहिती देण्याऐवजी अर्जदाराला अक्षरशः वेठीस धरले जात असून नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष करत भरपावसात नाली,रोड व इतर कामांवर विशेष लक्ष देत असल्याचे खळबळजनक आरोप नागरिकांकडून होताना दिसत आहे.या सर्व बाबींकडे लक्ष देणार तरी कोण! हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहेत.
#Right to Information Act...
#Nagar Parishad,Gadchandur...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@