Korpana : तालुक्यातील वडगाव येथे खरीप हंगामाच्या तोंडावरच एका शेतकऱ्यावर निसर्गाचा कोप ओढवला.13 जून शुक्रवार रोजी सायंकाळच्या सुमारास शेतात बांधलेली बैलजोडी,वीज पडून जागीच ठार झाली.या घटनेमुळे मारोती नागोबा देवाळकर,हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले.शासनाच्या मदतीची वाट पाहत असताना कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांना तात्काळ 20 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
मारोती देवाळकर,हे वडगाव शिवारातील आपल्या शेतात खरीप हंगामातील पेरणीच्या कामात व्यस्त होते.नेहमी प्रमाणे त्यांनी आपली बैलजोडी शेतातील एका झाडाखाली बांधली होती.सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला.आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला.काही क्षणातच, जोरदार वाऱ्यासह एक वीज थेट झाडाखाली बांधलेल्या बैलजोडीवर कोसळली.या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला होता.
देवाळकर कुटुंबासाठी ही बैलजोडी केवळ शेतीकामाचा आधारस्तंभ नव्हती,तर त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होती.ऐन पेरणीच्या हंगामात,जेव्हा बैलांची सर्वाधिक गरज असते,नेमकं तेव्हाच ही जोडी गमावल्याने देवाळकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले.नवीन बैलजोडी खरेदी करणे त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण असल्याने त्यांच्या शेतीची कामे खोळंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.या हृदयविदारक घटनेची माहिती मिळताच गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ देवाळकर यांच्या मदतीसाठी धावले.त्यांनी शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक चिंतामणराव बावणे,सचिव कवडू देरकर,प्रकाश गोरे यांनी 20 हजारांचा धनादेश दिला.यावेळी इतर शेतकऱ्यांची उपस्थिती होती.आर्थिक मदत केल्याबद्दल शेतकरी देवाळकर यांनी आभार व्यक्त केले आहे.
#Nisargacha Prakop....
#Financial assistance to farmers...
#Financial Assistance from Korpana Agriculture Producer Market Committee...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@