Action by Local Crime Branch Chandrapur : तलवार घेवून दहशत निर्माण करणाऱ्याला अटक!|Marathi News.

News@Crime...

  Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चंद्रपूरचे पथक स्थानिक शहर पोलीस स्टेशन हद्दीत 25 जून रोजी पेट्रोलींग करीत असतांना यातील आरोपी विक्रमसिंग सबजीतसिंग टाक(21),रा.जुनोना चौक,बाबुपेठ चंद्रपूर,हा महाकाली मंदीरजवळील हनी बार & रेस्टॉरंट समोर हातात तलवार घेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असतांना मिळून आल्याने त्याला शिताफीने पकडून,त्याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन,येथे संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,सुनिल गौरकार,पोहवा. सुभाष गोहोकार,सतीश अवथरे,रजनीकांत पुट्टेवार,पोअं. प्रशांत नागोसे,इमरान खान,किशोर,सुमित बरडे,शेखर माथनकर,सर्व LCB चंद्रपूर यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime Riport...

#Action by Local Crime BranchChandrapur...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-