Gadchandur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव साजरा केला जात आहे.या निर्णयाबद्दल देशभरातील विविध सामाजिक घटकांनी समाधान व्यक्त केला आहे.विशेषतः मागासवर्गीय आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी या निर्णयाचे स्वागत होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले जात आहेत.याच पार्श्वभूमीवर कोरपना व गडचांदूर येथे भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.गडचांदूर येथे राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या उपस्थितीत शहर भाजपच्या वतीने आणि कोरपना येथे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना तालुका भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे,यांच्या नेतृत्वात एकमेकांना पेढे भरवून,फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात जनगणना निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 'गडचांदुरात भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती.'
राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे,यांच्या उपस्थितीत साजरा झालेल्या जनगणना निर्णयाच्या आनंदोत्सवात चंद्रपुर जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे,ज्येष्ठ नेते महेश शर्मा,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,माजी नगरसेवक रामसेवक मोरे,महामंत्री हरीश घोरे,शंकर आपुरकर,ज्येष्ठ नेते विश्वंभर झाम,महादेव एकरे,राकेश अरोरा,मेहताब सर, रमेश चुदरी,विनोद इंगळे,जयंता भोंगळे,तुषार देवकर, विनोद बट्टलवार,अरविंद कोरे,भास्कर ऊरकुंडे,हनुभाऊ पातुरकर,गंगाराम किनाके,गिरीपुंजे,रामेश्वर सिंग,धर्मेद्र सिंग,विक्की उरकुडे,हरी कुसळे,बिनायक कुसळे,उत्तम देवकर,सुरज आगलावे,सुभाष डहाके,रामचंद्र खामनकर, विलास जगनाडे,गणपत बुरडकर,दिवाकर भेंडारे,ताहेर अली,सादीक अली,देविदास पेंदोर,दत्ता शेरे,बबलू रासेकर, रवि बंडीवार,वडस्कर,विनोद कावटकर,देविदास पेंदोर, संदीप शिंदे,द्रात्रय जगताप,जितेंद्र गानफाडे,पंकज इटनकर,योगेंद्र केवट,गणपत बुरडकर,गजानन मेंढी,चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे,महिला आघाडी शहराध्यक्षा शितल धोटे,महामंत्री उमा कंठाळे,नमीना बिश्वास,चंद्रपूर जिल्हा अनुसूचित जाती अध्यक्षा रंजना मडावी,तालुका महिला आघाडी सदस्या संगीता आत्राम,महिला कार्यकारणी सदस्या पुजा वाघमारे,धृपता काटवटे,वृंदा चवले,त्रिवेना जगताप,माया बामनवाडे,नयना चौधरी,उषा हिरादेवे,प्रिती हिरादेवे,शारदा फुसाटे,इंदु कोरे,अंजली विश्वास,सौ.चौधरी, अर्चना आंबेकर,सुंदरा दाळे,सौ.आत्राम यांच्यासह भाजपच्या विविध आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 'कोरपना येथे जल्लोष.'
कोरपना येथील जल्लोषात तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका संघटन महामंत्र सतीश उपलेंचवार,शहराध्यक्ष अमोल आसेकर,तालुका महामंत्री प्रमोद कोडापे,जिल्हा आदिवासी जिल्हाध्यक्ष अरुण मडावी,महिला तालुका महामंत्री ॲड.दिपाली मंथनवार,ॲड.पवन मोहितकर, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे,अबरार अली,विजय पानघाटे,संगीता चिंतलवार लक्ष्मी कुळमेथे,अशोक झाडे, महिला शहराध्यक्षा अलका रणदिवे,नगरसेविका वर्षा लांडगे,गीता डोहे,यु.मो.तालुकाध्यक्ष दिनेश खडसे,धम्म कीर्ती कापसे,पुंडलिक उलमाले,युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन बुरेवार,शहराध्यक्ष संजय नीत,मोहब्बत खान,मनोज तुमराम,शहर महामंत्री रवी बंडीवार,तालुका किसान आघाडी अध्यक्ष संजय पिंपळशेंडे,कवडू जरीले,मनोहर चव्हाण,हरबाजी झाडे,नागोराव आत्राम,अनिल ढवस, जितेंद्र पिंपळकर,रामदास कुंमरे,बाबाराव राऊत,रामस्वामी चंद्रगिरी,शंकर चिंतलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Caste Census....
#PM Narendra Modi....