Flavored Tobacco : सुगंधीत तंबाखू महिला विक्रेत्यावर कारवाई!|Marathi News...

News@Flavored Tobacco...

  Chandrapur : भद्रावती तालूक्यातील चंदनखेडा,येथील रहिवासी निर्मला शामराव चैके हिच्या घराच्या स्टोअर रुमची पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली तेंव्हा त्याठिकाणी 60 हजार 775 रु.किंमतीचा मजा 108 सुगंधीत तंबाखु,8 हजार 200 रु.किंमतीचा होला हुक्का शिषा तंबाखू आणि 6 हजार 400 रुपये किंमतीचा ईगल हुक्का शिषा तंबाखू असा एकुण 75 हजार 357 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.सदर प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

   सदर महिलेविरुध्द भद्रावती पोलीस स्टेशन,येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदरची कारवाई  जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,सहा.पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात अनुप आस्टुनकर,विश्वनाथ चुदरी,निकेश ढेंगे,योगेश घाटोळे यांनी केली आहे.

#Flavored Tobacco...

#Police Takes Strong Action Against illegal Flavored Tobacco seller...

                                    ----------//----------