Chandrapur Police : गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम; चंद्रपूर जिल्ह्यात 528 इसमांवर कारवाई !|Marathi News

News@Crime....

        Chandrapur :जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष प्रतिबंधक मोहीम (Preventive Action Camp)राबविण्यात येत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पोलीस उपविभागांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS)मधील कलम १२६ व १२९ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये एकूण ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

उपविभागनिहाय कारवाई :

दि.१६ जुलै २०२६ — वरोरा उपविभाग,BNSS कलम १२६ व १२९ अन्वये १०८ इसमांवर कारवाई.

दि.२७ ऑगस्ट २०२६ — वरोरा उपविभाग,BNSS कलम १२६ व १२९ अन्वये ११२ इसमांवर कारवाई.

दि.३ सप्टेंबर २०२६ — चंद्रपूर उपविभाग,BNSS कलम १२६ व १२९ अन्वये १३५ इसमांवर कारवाई.

दि.७ सप्टेंबर २०२६ — राजुरा उपविभाग,BNSS कलम १२६ व १२९ अन्वये ७४ इसमांवर कारवाई.

दि.९ सप्टेंबर २०२६ — चिमूर उपविभाग,BNSS कलम १२६ व १२९ अन्वये ९९ इसमांवर कारवाई.

अशाप्रकारे आतापर्यंत एकूण ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

ब्रह्मपुरी-मूलमध्येही कारवाईचा पुढील टप्पा :

या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून ब्रह्मपुरी आणि मूल उपविभागां मध्ये येत्या दोन दिवसांत विशेष प्रिव्हेन्टिव्ह कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.या कॅम्पदरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच समाजात उपद्रव निर्माण करण्याची शक्यता असलेल्या संशयित इसमांवर कायद्यानुसार प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात शांतता,सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचे वातावरण कायम राहावे यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे. समाजकंटक आणि उपद्रवी घटकांवर यापुढेही अशाच प्रकारची कडक व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

#Chandrapur Police Action #Crime News 

                          ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢