BJP News : आ.देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाला वाढता प्रतिसाद; पक्षप्रवेशाची मालिका सुरूच!| Marathi News.

News@BJP...

         Gadchandur : ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी आणि तळागाळातील नागरिकांच्या हक्कांसाठी भारतीय जनता पक्ष नेहमीच अग्रभागी राहिला आहे.भाजप हा केवळ सत्तेसाठी नव्हे, तर लोकहितासाठी अहोरात्र काम करणारा पक्ष आहे,असा ठाम विश्वास राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला.

जिवती तालुक्यातील येल्लापूर येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजयुमो अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुबोध चिकटे यांच्या माध्यमातून गडचांदूर येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.

आमदार भोंगळे म्हणाले की,देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासकामांना वेग आला आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे.पक्षाची सर्वसमावेशक धोरणे आणि गतिमान विकासकामांमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या विश्वासाने भाजपकडे येत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजपचा दुपट्टा घालून स्वागत केले.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कर्णू पाटील कुंभरे, जगेराव पेंदोर,मोतीराम पेंदोर,कांशीराम पेंदोर,रामूजी पेंदोर, भीमराव सोयाम,जंगुजी कुळमेथे,चंदू पेंदोर,माणिक मेश्राम, प्रकाश कांबळे,झोटिंग वाघवसे,मनोहर मोरताटे,किशोर कांबळे आणि संग्राम कांबळे यांचा समावेश आहे.

दरम्यान,आमदार देवराव भोंगळे यांच्या विकासकामांचा धडाका आणि त्यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याची भावना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी भाजपचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे,तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार,जयंत भोंगळे,नितेश भिवापूरे,गणेश आदे,देविदास पेंदोर यांच्यासह भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Bharatiya Janata Party. #Political Explosion. #MLA Deoraodada Bhongle.

                          ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢