SIR Voter List 2026 : मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 2,500 ची मागितली लाच; BLO एसीबीच्या जाळ्यात | Marathi News.

News@SIR Voter List...

      Parbhani Crime News : शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात.मात्र, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी थेट लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार परभणीत उघडकीस आला आहे.या प्रकरणात 2,500 रुपयांची लाच मागणाऱ्या सहशिक्षक तथा BLO ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)रंगेहाथ पकडले.रामेश्वर विलास काळे,असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ते परभणी शहरातील एका शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.ते परभणी विधानसभा मतदारसंघात BLO(Booth Level Officer)म्हणूनही काम पाहत होते.

            सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,SIR फॉर्मच्या प्रक्रिये दरम्यान 2002 च्या मतदार यादीत नाव नसल्याने एका कुटुंबाचे नाव सध्याच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आरोपी रामेश्वर काळे यांनी 2,500 रुपयांची लाच मागितली.तक्रारदाराने आपल्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता.पण संबंधित सदस्यांची नावे 2002 सालच्या मतदार यादीत नसल्याचे समोर आले होते. तर कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी BLO रामेश्वर काळे,यांनी तब्बल 2500 रुपयांची लाच मागितली.तर,तडजोडीनंतर 2 हजार रुपयांवर BLO तयार झाला.

        यानंतर संबंधित तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(ACB)कडे तक्रार केली.त्या तक्रारी नंतर ACB कडून प्राथमिक पडताळणी करण्यात आली.ज्यात सदर BLO ने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.यानंतर ACB च्या पथकाने सापळा रचला.तर ठरल्याप्रमाणे 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना BLOरामेश्वर काळे यांना ACB ने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.याप्रकरणी परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे.परभणीतील नवा मोंढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

      दरम्यान,मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या लोकशाही प्रक्रियेसाठीच लाच मागितल्याने या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.नागरिकांकडूनही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात असून, “आता याच कामासाठी लाच मागायची बाकी होती!” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

#SIR Voter List 2026. #Crime News.##Crime. #Parbhani SIR News.

                             ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢