Gadchandur :महिलांचा सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण, ही भारतीय जनता पक्षाची प्रमुख भूमिका असून,केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांमुळे महिला स्वावलंबी होत आहेत.जिवतीसारख्या दुर्गम व आकांक्षित तालुक्यातील महिला विकासाच्या वाटचालीसाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत.महिला शक्तीची साथ भाजपला मिळत असल्याचे प्रतिपादन राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
जिवती येथील काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा नंदा मुसणे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.
आमदार भोंगळे म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिवती तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न तसेच विविध विकास कामांना गती देण्यात येत आहे.मागील तीन पिढ्यांपासून प्रलंबित असलेल्या वनजमिनीच्या निर्वणीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून,शेकडो विकासकामांना गती देण्यात आली आहे.तसेच विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माराई पाटण येथील गंगामाता देवस्थानाला नुकताच ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यापुढेही जिवती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या पक्षप्रवेशावेळी नंदा मुसणे यांच्यासह दर्या सावरगावे, अहिल्याबाई भुईनवाड आणि लक्ष्मीबाई चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात जिवती तालुक्यात सुरू असलेली विकासकामे आणि त्यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले आहे.त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची भावना नवप्रवेशित महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सौ.अर्चना भोंगळे,माजी पंचायत समिती उपसभापती महेश देवकते,पुंडलिक गिरमाजी,सौ.पुष्पा सोयाम,शेणगावचे नरसिंह हामणे,दमपूर-मोहदा येथील सरपंच नारायण वाघमारे, बबन वारे,प्रेमदास राठोड,प्रदीप बोबडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#BJP News. #Joined the Bharatiya Janta Party.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢

