Gadchandur : न.प.तील कथित अपहार प्रकरणाला वेग; डोहेंच्या तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालया कडून दखल,मुख्याधिऱ्यांना निर्देश!| Marathi News.

News@N.P.Case...

        Korpana : तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेचे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक 'येमाजी धुमाळ' यांनी घनकचरा डेपोकरिता भाडेतत्त्वावर जमीन घेण्याच्या प्रक्रियेत कथितरीत्या बोगस निविदांचा आधार घेत नगरपरिषद निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.या प्रकरणी गडचांदूर भाजप मंडळ अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केलेल्या तक्रारीची चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून सदर प्रकरणी नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश विद्यमान नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत.

  अरविंद डोहे यांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२५ मे २०२६ रोजी नगराध्यक्षसह सर्व सभापती आणि नगरसेवकांना टपालाद्वारे निवेदन पाठवून या प्रकरणी विशेष सभा बोलावून फौजदारी कारवाईचा ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ९ नगरसेवकांनी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमाच्या कलम ८१ अंतर्गत विशेष सभा घेण्याची मागणी केली.मात्र, नगराध्यक्षांनी सभा न बोलावल्याने कलम ८१ चा भंग झाल्याचा आरोप डोहे यांनी केला आहे.

        यासोबतच,नगरपरिषद निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने नियमबाह्य पुलाचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोपही डोहे यांनी केला आहे.सदर प्रकरणाची चौकशी विद्यमान मुख्याधिकाऱ्यांकडे असल्याने,सत्ताधारी गटाने भीतीपोटी तत्कालीन मुख्याधिकारी येमाजी धुमाळ,यांच्या विरोधात ठराव घेण्याचे धाडस केले नसावे,असा खळबळजनक आरोपही डोहे यांनी केला.दरम्यान,डोहे यांच्या तक्रारीनंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत सहआयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या स्वाक्षरीने दि.१६ मे २०२६ रोजी गडचांदूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

'काय आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे.'

येमाजी धुमाळ यांच्यावरील कथित अपहाराच्या आरोपांचा संदर्भ पत्रात नमूद करण्यात आला आहे.

तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची नियमानुसार तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

क्रमांक/कार्या-१०/नपप्र/टे-५/२०२६/१९२ अन्वये मुख्याधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

                            'अरविंद डोहे यांची प्रतिक्रिया.'

     “चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने माझ्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल मी आभारी आहे.आता माझ्या मागणी प्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी त्या कथित बोगस निविदा प्रकरणची तसेच नियमबाह्य पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करावी.आणि दोषी आढळणाऱ्यांविरोधात नगरपरिषदेच्या सभेत विषय मांडून एफआयआर दाखल करावी,” अशी विनंती वजा मागणी आहे." अशी प्रतिक्रिया अरविंद डोहे यांनी दिली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशांनंतर आता मुख्याधिकारी काय कार्यवाही करणार आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका काय असणार? याकडे गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.

        'मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र.'

                                    👇👇👇

#Gachandur Nagarparishad.

                       $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$