Gadchandur : आकाशवाणी चंद्रपूरच्या लोकप्रिय ‘कृषिवाणी’ कार्यक्रमांतर्गत आज (९ जून) सायंकाळी ७.३० वाजता गडचांदूर येथील युवा उद्योजक सतीश बेतावार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.मत्स्यपालन व मत्स्यबीज निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या बेतावार यांच्या उद्योजकीय प्रवासाचा उलगडा या मुलाखतीतून होणार आहे.Chandrapur Akashvani.मुलाखतीदरम्यान त्यांनी मत्स्यपालन व्यवसायातील वाढत्या संधी,आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,मत्स्यबीज निर्मितीची प्रक्रिया तसेच ग्रामीण भागातील युवकांसाठी उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
या मुलाखतीतून मत्स्यपालन व्यवसायासाठी आवश्यक नियोजन,शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा,तसेच व्यवसायातील आव्हानांवर मात करत यशस्वी वाटचाल कशी करावी याविषयीचे त्यांचे अनुभव श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत.सतीश बेतावार यांच्याशी संवाद गौरी गोवाडे यांनी साधला असून कार्यक्रमाचे सादरीकरण उमेश दुपारे यांनी केले आहे.हा कार्यक्रम आज सायंकाळी ७.३० वाजता १०३ मेगाहर्ट्झ एफएम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावर प्रसारित होणार आहे.मत्स्यपालन तसेच कृषीपूरक व्यवसायांमध्ये रस असलेल्या शेतकरी,उद्योजक आणि युवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
#Chandrapur Akashvani.#Krishi Vani.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
