Sand Smuggling News : अवैधरित्या वाळू तस्करीवर LCB ची कारवाई!|Marathi News.

News@Crime...

    Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)पथकाने 14 मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा बल्लापूर,येथे अवैधरित्या वर्धा नदी पत्रातून गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या एक विना नंबर असलेल्या ट्रॉलीच्या ट्रॅक्टरवर कारवाई केली.यामध्ये एक ट्रॅक्टर क्र.MH/34/BV/2632 की.अं.5 लाख, एक ब्रास वाळू कि.अं.10 हजार,असा एकूण 5 लाख,10 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विनोद विठ्ठल आत्राम रा. बल्लारपूर व पाहिजे असलेला आरोपी पूनमचंद बहुरिया रा. बल्लारपूर,यांच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन,येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर पोलीस पथक व LCB च्या पथकाने केली आहे.

#illegal sand Smuggling News.#Action by LCB Chandrapur.

                              $$$$$$$$$$$$$$$$$$$$