Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक,यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर 13 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा (LCB)पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती वरून मौजा तोरगाव ता.ब्रम्हपुरी,येथे अवैध दारू विक्रेत्यांवर छापा टाकण्यात आला.यामध्ये शैलेंद्र रामटेके वयवर्ष 54 रा. तोरगाव,या आरोपीकडून 4 पेटी(192 नग)देशी दारूच्या 180ml च्या बाटल्या,कि.अं.15 हजार 360 रूपये,1पेटी (100 नग)देशी दारूच्या 90ml च्या बाटल्या,कि.अं.4 हजार.
तसेच पितांबर लुटे वयवर्ष 34 वर्ष रा.तोरगाव,या आरोपीकडून 3 पेटी(144 नग)देशी दारू 180ml च्या बाटल्या,कि.अं.11हजार 520 रुपय,1पेटी(100 नग)देशी दारूच्या 90ml च्या बाटल्या कि. अं.4 हजार रुपये,1पेटी(48 नग)विदेशी दारू no.1च्या 180ml च्या बाटल्या कि.अं.10 हजार 80,असा एकूण 44 हजार,960 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली असून,आरोपीविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी उपविभागाचे पथक व LCB च्या पथकाने केली आहे.
#Illgal Liquor Case.#Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
