Chandrapur : जिल्ह्यातील पाथरी पोलीस स्टेशन येथे 31 जानेवारी रोजी तक्रार प्राप्त झाली होती की,सोला मेंढा प्रकल्पाचा पाथरी जवळील कॅनलमध्ये टायगर पासचे काम सुरू आहे.सदर कंस्ट्रक्शन साईटवरून 126 सलाख वजन अंदाजे 12 क्विंटल 60 किलो किं.अं.37 हजार 800 रुपयांचा माल चोरीस गेला आहे. यावरून पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदवून गोपनिय माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आली होती.दरम्यान रामभाऊ वकटुजी ठिकरे वयवर्ष 54 व त्याची 2 मुले,अमित रामभाऊ ठिकरे वयवर्ष 30 आणि जयंत रामभाऊ ठिकरे वयवर्ष 28(सर्व रा.पाथरी)यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबूली दिली.यावरून त्यांना ताब्यात घेऊन चोरीला गेलेला संपुर्ण माल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे उपविपोअ.सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात,सहपोनि.नितेश डोर्लीकर यांच्या नेतृत्वात पोउपनि.गोंविद चाटे,पोहवा.सुनिल गेडेकर,पोअं.अमित मस्के,पोअं.मेधश्याम गायकवाड,पोअं.गिरीधर आंबोकर,पोअं. बळीराम बारेकर,चालक पोअं.दत्ता शिंदे यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News.#Iron bar thief in police custody.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
