Chandrapur : सर्वसंपन्न असलेल्या विदर्भाचे महाराष्ट्राने मागील 65 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शोषण केले.आज राज्याची बुडीत निघालेली अवस्था बघता,विदर्भ आणि येथील जनतेची परिस्थिती कदापीही सुधारणे शक्य नाही. 'हे राज्य दिवाळखोरीत निघाले आहेत.शंभर वर्षही महाराष्ट्रात राहिले तरी, विदर्भातील जनतेचे भले होणार नाही?' असे वास्तववादी जळजळीत मत राजुरा विधासभेचे माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड.वामनराव चटप यांनी व्यक्त केले.ते 1 मे रोजी(महाराष्ट्रदिनी)चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयपुढे आयोजित 'विदर्भ राज्य आंदोलन समिती'च्या धरणे आंदोलनात बोलत होते.
यावेळी ॲड.चटप पुढे म्हणाले की,द्विभाषिक राज्यात 4 वर्ष व मराठी राज्य महाराष्ट्रात 65 वर्ष राहूनही विदर्भाच्या वाट्याला शेतकरी आत्महत्या,प्रदुषण,कुपोषण,बालमृत्यू, गर्भारमाता मृत्यू,नक्षलवाद,सिंचनाचा अनुशेष,कमी झालेले 4 आमदार व 1 खासदर,यामूळे कमी झालेले प्रतिनिधीत्व आणि नोकरीसाठी सुशिक्षीत बेरोजगारांचे सुरू असलेले स्थलांतर,नागपूर कराराप्रमाणे व घटनात्मक दुरुस्तीनंतर घटनेला 371(2),हे कलम जोडल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमांनी विदर्भाला लोकसंख्येच्या आधारावर 23 टक्के निधी देणे बंधनकारक होते.परंतू,सिंचन,सार्वजनिक आरोग्य,शिक्षण,आदिवासी विकास,पिण्याचे पाणी,समाजकल्याण,या विभागासाठी 75 हजार कोटी रुपयांचा निधी मिळणे क्रमप्राप्त होते व एवढा विदर्भाचा अनुशेष वेगवेगळ्या येणाऱ्या सरकारने वाढविलेला आहे.हे सर्व रोखण्यासाठी विदर्भाचे स्वतंत्र राज्य,हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात झालेल्या सदर आंदोलनात शालिक माऊलीकर,निळकंठ कोरांगे,रवी वाढई,सुर्यंकांत खनके,शेषराव बोंडे,अंकुश वाघमारे,मुन्ना खोब्रागडे,ॲड.प्रीतिषा साहा,ॲड.तबस्सुम शेख,बंडू देठे, हंसराज वनकर,सदानंद चांदेकर,मोहम्मद गुफरान, पुंडलीक गोठे,ॲड.प्रफुल्ल आस्वले,मारोती बोथले,सुनिल बावणे,भास्कर मत्ते,रवि गोखरे,सुधीर सातपुते,बबन रणदिवे,मधुकर चिंचोलकर,नरेंद्र मोहारे,विलास पायपरे, विनायक महाकुलकर,भोजराज पप्पुलवार,अरूण सातपुते,जगन्नाथ दानव,देविदास रामटेके,भाऊजी कन्नाके, सौरभ मादसवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. "विदर्भ आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा,जय विदर्भ जय-जय विदर्भ,लेके रहेंगे,लेके रहेंगे, विदर्भ राज लेके रहेंगे", अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.दुपारी 12 पासून 3 वाजेपर्यंत धरणे देण्यात आले.पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
#Vidarbha Rajya Andolan Samiti...