Gadchandur : गेल्याच महिन्यात मारडा रेतीघाटातून अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर राजुरा महसूल विभाग व राजुरा पोलिसांनी कारवाई केली होती. काही दिवस याठिकाणी शांततापूर्ण वातावरण होते.मात्र, काही दिवसांपासून पुन्हा मारडा रेतीघाटातून रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरद्वारे जवळपासच्या गावांत जास्त दराने विक्री केली जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सुत्रांकडून मिळाली आहे.अल्पश: विरामानंतर मारडा रेतीघाटावर रेती तस्कर पुन्हा सक्रिय झाल्याची बाब नाकारता येत नाही. आता याला रेती तस्करांची मुजोरी म्हणावी की,संबंधीतांचा आशिर्वाद? हे कळायला मार्गच नाही. रेतीचा उपसा करून दररोज 3 ते 4 ट्रीप बिनधास्तपणे ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक होत असताना संबंधीत क्षेत्राचे मंडळाधिकारी,तलाठी व बिट जमादार,यापैकी एकाला हे चित्र दिसत नसेल का? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहेत.या मुजोर रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.मात्र, कारवाई करणाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी असेल तर कारवाई करणार तरी कोण? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने नागरिक उपस्थित करत आहेत.
मागील जवळपास 2 वर्षापासून जिल्ह्यातील रेती घाट बंद आहे.परिणामी रेती अभावी खाजगी व घरकुलाची कामे रखडली आहेत.शासकिय,निमशासकीय इमारतींच्या कामासाठी शासनाकडून काही रेती घाट राखीव करण्यात आल्याची माहिती आहे.या रेती घाटातून तस्करांकडून रेतीची चोरी सुरू असल्याची माहिती आहे.प्रशासनाच्या काही मंडळींना हाताशी धरून रेती तस्कर कोट्यावधींच्या रेतीची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहेत.रेती तस्करीचा मुद्दा गेल्या अधिवेशनात चांगलाच गाजला.रेतीघाटांचा लिलावही होणार होता.मात्र,ही प्रक्रिया सध्या रद्द झाली आहेत.यामुळे आता रेती तस्करांना मोकळे रान उपलब्ध झाले आहेत.याच पार्श्वभूमीवर राजुरा महसूल व पोलीस विभागाने लक्ष देऊन शासनाचे नियम धाब्यावर बसवून मारडा घाटातून होणारी रेती तस्करीवर अंकुश लावण्यासाठी पाऊले उचलावी, पर्यावरणाचा ऱ्हास वाचवावा,अशी मागणी काही पर्यावरण प्रेमींनी केली आहे.कारवाईकडे लक्ष लागले आहेत.
#Crime...
#Illigal Sand Smuggling...
#Illegal Sand Smuggling from Marda Sand Ghat...