Gadchandur : चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चितेगाव येथे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद व श्रमिक एल्गार-एल्गार संघटना,गुरुदेव सेवा मंडळाद्वारा आयोजित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुतळा अनावरण व 'ग्रामजयंती' निमित्त 'ग्रामगीता महोत्सवात' कोरपना तालुक्यातील नांदा येथील सक्रिय प्रचारक,अष्टपैलू व्यक्तिमत्व 'भास्कर लोहबळे' यांचा 'आदर्श सक्रिय श्रीगुरुदेव सेवक' म्हणून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंडोपंत बोढेकर ग्रामगीताचार्य होते तर समाजसेविका ॲड.पारोमीता गोस्वामी उदघाटक म्हणून उपस्थित होत्या.ॲड.कल्याण कुमार,ॲड.राजेंद्र जेनेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.भास्कर लोहबळे यांचा उपस्थित मान्यवरांचा हस्ते शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह व राष्ट्रसंत साहित्य देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सिद्धावार यांनी केले.भास्कर लोहबळे यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
#Gram Gita Festival...
#Respected as a Servant of Shri Gurudev...