Gadchandur : राजुरा-गोविंदपूर नॅशनल हायवेचे काम जोरात सुरू आहे.सदर मार्ग गडचांदूर शहरातून जात असल्याने याठिकाणी मुख्य मार्गावर जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे.कित्येक ठिकाणी पाइप लाईन फुटल्याने ऐन उन्हाळ्यात शहरातील काही वार्डात भीषण पाणीटंचाई असून नगर परिषदेच्या माध्यमातून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहेत.अशातच नगर परिषद प्रशासनाचा एक प्रताप समोर आला आहे.एकिकडे शहरात पाणीबाणी असताना दुसरीकडे मात्र एका 'सर्व्हिसिंग सेंटर' ला वाहने धुवायला हजारो लिटर नीयमितपणे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.नागरिक हंडाभर पाण्यासाठी त्रस्त असताना सर्व्हिसिंग सेंटरला पुर्ण टॅंकर रिकामा करून दिला जात आहेत.पाणीटंचाईच्या काळात नगर परिषद व्यवसायीकांना पाण्याचा पुरवठा करू शकते का? असा प्रश्न उपस्थित होत असून यामध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही?
सदर प्रकरणी नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी, यांनी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष देऊन नागरिकांना योग्यरित्या पाणीपुरवठा करावा,अन्यथा लोकांना होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन तिव्र आंदोलन उभारण्याचा संतापजनक इशारा माजी नगरसेवक तथा गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी दिली आहे. आता मुख्याधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहेत.
#Water Crisis...
#Water Issue in Gadchandur...
#Nager Parishad Agadchandur...
#Former Corporator Arvind Dohe...