Jammu and Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीर अतिशय शांत आणि रम्य अशा पहलगाममध्ये मंगळवारी भीषण असा दहशतवादी हल्ला झाला.दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून वेचून मारले. अनेक राज्यातील 26 लोकांचा या हल्ल्यात जीव गेला. यामध्ये स्थानिक नागरिक सैय्यद आदिल हुसैन शाह याचाही समावेश होता.पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरन पर्वत रांगामधील पॉईंट दाखविण्याचे काम तो करत होता.जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला,तेव्हा पर्यटकांना वाचविण्यासाठी तो थेट दहशतवाद्यांशी भिडला,मात्र यात त्याला जीव गमवावा लागला.आदिल हुसैनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.पर्यटकांना घोड्यावरून नेण्याचे काम करणारा आदिल त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता,असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
आदिलचे वडील सैय्यद हैदर शाह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की,माझा मुलगा मंगळवारी पर्यटकांना घेऊन वर गेला होता.दुपारी 3 च्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली.आम्ही तातडीने मुलाला फोन लावला,तर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता.त्यानंतर 4/40 ला त्याचा फोन सुरू झाला.पण समोरून कुणीही उत्तर देत नव्हते.आम्ही पोलीस ठाण्यात गेलो आणि माहिती घेतली असता तो जखमी झाल्याचे कळले.
मृत आदिलच्या आईने रडत रडत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या,तो आमचा एकुलता एक आधार होता.घोडे भाड्याने देऊन तो कुटुंबासाठी पैसे कमवत होता.आता आमच्या उदरनिर्वाहाचे काय? त्याच्याशिवाय आमचे भविष्य काय? याची कल्पनाही करवत नाही.आदिलच्या काकांनी सांगितले की,तो घरातील सर्वात मोठा मुलगा होता.त्याची पत्नी आणि मुले आता उघड्यावर पडली आहे. त्यांनी सर्व काही गमावले आहे.आमची सरकारला विनंती आहे की,त्यांनी आदिलच्या परिवाराला मदत आणि सुरक्षा पुरवावी.सैय्यद आदिल हुसैन शाह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतर मंत्री,अधिकारी उपस्थित होते.पहलगाम वासियांनी आदिलला शेवटचा निरोप दिला.
'वाचलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबिती!'
या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी पोलीसांना घडलेला प्रकार सांगितला.“बैसरण येथील गवताळ कुरणाच्या परिसरात चार माणसे लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले.त्यांनी आल्यावर आमची नावे विचारली.आम्हाला वाटले ते सुरक्षा रक्षक आहेत.पण,अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केले.महिलांना त्यांनी सोडून दिले. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”,असे एका महिला पर्यटकाने सांगितल्याचे तपास अधिकाऱ्यांनी नमूद केले.#Terror Attack...
#Jammu and Kashmir Terror Attack...
#Pahalgam attack horseman Syed Adil Hussain...
#Pahalgam Attack brave person...