MLA Sudhir Mongantiwar : 15 गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी!|Marathi News.

News@💧Problem...

      Chandrapur : राज्याचे माजी वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील 15 गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.एप्रिलच्या सुरुवातीला आढावा बैठक घेऊन 15 गावांची पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार,यांनी दिले होते.त्यानुसार कार्यवाही करीत प्रशासनाने या गावांचा पाणी पुरवठा सुरू केला आहे.ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईने होणारी अडचण दूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आ.मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

    पोंभुर्णा ग्रीड अंतर्गत 1 जून 2022 ला 15 गावांची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे(मजीप्रा) कार्यान्वीत करण्यात आली.त्यानंतर मजीप्रातर्फे ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न झाला.परंतू, 15 पैकी 8 गावांना पाणी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे योजना हस्तांतरीत होऊ शकली नव्हती.त्याचवेळी मजीप्रा कडे वीज देयकाचा भरणा करण्यासाठी निधी नसल्यामुळे ही योजना डिसेंबर 2024 मध्ये बंद पडली.आणि 15 गावांची योजना बंद झाल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली.

पोंभूर्णा माजी उपसभापती विनोद देशमुख,यांनी याविषयी आ.मुनगंटीवार यांना कळवले.त्यानंतर आ.मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे 5 एप्रिल 2025 रोजी आढावा सभा घेतली.15 गावांतील लोकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे.त्यामुळे योजना सूरू करण्याबाबत गावकऱ्यांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे आग्रह धरला.आ.मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ योजना सुरू करण्याचे निर्देश दिले.त्यानंतर आ.मुनगंटीवार यांच्या आदेशांनुसार जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे 25 एप्रिल 2025 रोजी पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज देयकाचा 5.71 लाख रुपयांचा भरणा करण्यात आला व पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सूरू करण्यात आला. 

                        'गावकऱ्यांनी मानले आभार'

आ.मुनगंटीवार यांनी आढावा सभा घेऊन निर्देश दिल्या नंतर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आमच्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला,या शब्दांत गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

                           'या 15 गावांना झाला लाभ'

चक ठाणेवासना,नवेगाव मोरे,चक नवेगाव,मोहाडा,वेळवा, सेलूर नागारेडी,चक कोंसबी-1,फुटाना,देवाडा खुर्द,जाम तु. ,रामपूर दीक्षित,बोर्डा दीक्षित,कसरगट्टा,चक घनोटी-1,जाम खु.या गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

#MLA Sudhir Mongantiwar...

#Water Problem...

                                        ----------//----------