Gadchandur : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम,येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली.या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे.याच श्रेणीत 26 एप्रिल रोजी कोरपना तालुक्यातील शहर, गडचांदूर येथे समस्त शहरवासीयांच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक,येथे निषेध सभा आयोजित करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि दहशतवादाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.'जय हिंद,भारत माता की जय' अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणला होता.दरम्यान गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदारामार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवण्यात आले.यामध्ये सर्वप्रथम पाकिस्तान संदर्भात 'ते' 5 कडक निर्बंध लावल्या बद्दल गृहमंत्री अमित शहा व भारत सरकारचे अभीनंदन करण्यात आले.ज्या प्रकारे निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली,त्यामुळे हिंदुंच्या भावना तीव्र झाल्या आहे. जागतीक स्तरावर पाकिस्तानला आतंकवादी देश घोषीत करावा,हल्ल्यातील मृतांना शहीदांचा दर्जा द्यावा, अतिरेक्यांवर कार्यवाही करून फाशीची शिक्षा द्यावी, भारत सरकारने दहशतवादी शक्तींना कठोरात कठोर उत्तर द्यावेत,जेणेकरून भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निषेध सभा व निवेदन देताना शहरातील सर्वपक्षीय नेते, महिला-पुरूष कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी बांधव आणि हिंदू-मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या पाकड्यांना चांगलाच धडा शिकवायला हवं,अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
#Terror Attack...
#Jammu and Kashmir Terror Attack Marathi News...
#Gadchandur Citizen...