Chandrapur : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जणू सुर्यच आग ओकत असल्याचे तापमानावरून दिसून येत आहे. विदर्भातील नागपूर,अकोला व अमरावती जिल्ह्यांनी परवापर्यंत तापामनाचा उच्चांक गाठला होता.तो उच्चांक कालपासून चंद्रपूरने मोडीत काढनला आहे.कालपेक्षा आजच्या तापमानात तब्ब्ल 1 अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने आज(21 एप्रिल) चंद्रपूरचे तापमान 45.6 झाले आहे.त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरानेही तापमानाचा उच्चांक गाठीत राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मागे टाकले आहे.आजचे चंद्रपूरचे तापमान देशात सर्वात जास्त आहे.चंद्रपूर 45.6 तर 0.6 अंश सेल्सिअशाने वाढून ब्रम्हपुरीचे तापमान 45.0 झाले आहे.
मे व जून बाकी असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भात सुर्य आग ओकत आहे.त्यामुळे विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरने कालपासून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.काल(20 एप्रिल)चंद्रपूरच्या तापमानात 0.6 अंशाने वाढ झाली होती.त्यामध्ये आज पुन्हा तब्ब्ल 1 अंश सेल्सिअश तापानाने वाढ झाली आहे. आजचे चंद्रपूरचे तापमान 45.6 अंश सेल्सिअश ऐवढे नोंदविले गेले आहे.
चंद्रपूरचे तापमान देशात सर्वात जास्त आहे.एप्रिलमध्ये चंद्रपूरची रेकार्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे.याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचे तापमानही प्रचंढ वाढले आहे. 45.0 ऐवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भातील अकोला,नागपूर, चंद्रपूर व वर्धेचे तापमान 44 अंशाच्या पार गेले होते.नागपूर व अकोल्याने परवापर्यंत चंद्रपूरला ही मागे टाकले होते.मात्र कालपासून चंद्रपूरचा पारा प्रचंढ वाढला आहे.
"उष्ण लाटेपासून बचाव होण्यासाठी काय करावे?"
पुरेसे पाणी प्या,शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा.घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी,रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.थेट येणाऱ्या सुर्य प्रकाशाला/उन्हाला अडविण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही,किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.हलकी,पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
"उष्ण लाटेपासुन बचाव होण्यासाठी काय करु नये?"
उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.दारु,चहा,कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.गडद,घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे,तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
"हवामान खात्याने सोमवारी नोंदविलेले तापमान."
त्यामध्ये आज विदर्भातील चंद्रपूर 45.6,ब्रम्हपुरी 45.0, अमरावती 44.6,अकोला 44.1,नागपूर 43.6, यवतमाळ 43.4,वर्धा 43.4,गडचिरोली 43.0, वाशिम 42.5,गोंदिया 42.1,भंडारा 41.4,बुलढाणा मध्ये 39.86 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.चंद्रपूर व ब्रम्हपुरी शहरातील तापमानात प्रचंढ वाढ झाल्याने जिल्ह्यातील रस्ते सकाळी 11 वाजल्यापासून निर्मनुष्य पहायला मिळाले.अंगाची लाही लाही करणारे तापमान असल्यामुळे येथील अकुशल कामावर परिणाम झालेला आहे.
#Chandrapur District WEATHER TODAY...
#Chandrapur's Temperatures is the Hottest in the Country...